ऑनलाईन टीम / मुंबई :
ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ॲमेझॉन आणि बिग बास्केट कंपनीला पश्चिम बंगाल सरकारने ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना मद्य विक्री दुकानांवर गर्दी होऊ नये, यासाठी पश्चिम बंगाल सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्वीगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांना मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगाल बीव्हीरेज कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीने ॲमेझॉन आणि बिग बास्केटला मद्य विक्रीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र अदा केले आहे.
बिग बास्केटने ऑनलाईन मद्यविक्री क्षेत्रात पहिल्यांदाच पाऊल टाकले आहे. घरपोच मद्यविक्री कधीपासून सुरू होईल, याबाबत आत्ताच सांगता येणार नसल्याचे बिग बास्केटचे प्रमुख हरी मेनन यांनी सांगितले.