ओटवणे /प्रतिनिधी-
प्रोऍक्टिव्ह ॲबॅकस समर कॉम्पिटिशन २०२१ या ऑनलाईन परीक्षेत माडखोल केंद्रशाळा नंबर १ मधील दिनेश कृष्णा राऊळ या विद्यार्थ्याने उज्वल यश संपादन करीत व्दितिय क्रमांक पटकाविला. दिनेश राऊळ हा माडखोल परिसराच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सेवाभावी युवा व्यक्तिमत्व कृष्णा उर्फ जिजी राउळ यांचा मुलगा आहे.
या स्पर्धेसाठी कु दिनेश राऊळ याला बांदा येथील एकलव्य अबॅकस या संस्थेतील स्नेहा केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई-वडिलांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. माडखोल केंद्रशाळा नंबर १ चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण म्हाडगुत यांनी कु दिनेश राउळ याचे पुष्पगुच्छ, भेट वस्तू देऊन त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी माडखोल शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका रश्मी सावंत, दीपक पंडित, सीमा पंडित उपस्थित होते.









