बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात २३ ऑगस्टपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याने, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने असा दावा केला आहे की, शिक्षकांनी सरकारच्या निर्णयानुसार प्राधान्याने कोरोना लस घेतली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस. आर. उमाशंकर यांच्या मते, ८४ टक्के शिक्षकांनी लसीचा एक डोस घेतला होता, तर १९ टक्के शिक्षकांना तापर्यंत दोन्ही डोस दिले गेले.
दरम्यान, विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोग्य विभागाने अद्याप शाळांमध्ये लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या पुढे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. “यामध्ये नॉन-लसीकृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अगदी ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची माहिती समाविष्ट असेल. या यादीच्या आधारे त्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील नववी वरील ऑफलाइन वर्ग पुढील सोमवारी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू होणार आहेत.









