ऑनलाईन टीम/तरुण भारत
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी नऊ महिला नक्षलवाद्यांसह ४४ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं. जिल्ह्यात सुरू असलेल्या पूना नरकोम मोहिमेत प्रभावित होऊन आणि स्थानिक आदिवासींवरील शोषण, अत्याचार, भेदभाव आणि हिंसाचाराने त्रस्त झालेल्या 44 सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं असं सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितलं. शर्मा म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्लाटून क्रमांक चारचा सदस्य मडकम दुला (22) याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस आहे.