बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात आणखी एक ऑक्सिजन एक ऑक्सिजन एक्सप्रेस बेंगळुरात दाखल झाली. ९८ टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस आज बेंगळूर येथे दाखल झाल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने दिली आहे. सहा क्रायोजेनिक कंटेनरमधून ९८.९ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) घेऊन आलेली ३५ वी “ऑक्सिजन एक्सप्रेस” शहरात पोहोचली. असे नैऋत्य रेल्वे विभागाने सांगितले मंगळवारी सांगितले.
आतापर्यंत कर्नाटकला रेल्वेमार्गाने ३,९५९.५१ टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे. “३५ वी ऑक्सिजन एक्सप्रेस आज सकाळी ९.१० वाजता इनलँड कंटेनर डेपो, व्हाइटफील्ड, बेंगळूर येथे पोहोचली आहे. १३ जून रोजी सायंकाळी ०५.०९ वाजता गुजरातच्या जामनगरच्या कानलूस येथून ती निघाली होती.
भारतीय रेल्वेने आतापर्यंत ४२४ ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत आणि १,७४८ टँकरमधून ३०,४५५ टन एलएमओची देशभरात वाहतूक केली असून कोरोना विरोधात १५ राज्यांना दिलासा मिळाला आहे.









