नंदकुमार तेली / कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनसाठी स्थानिकांसह देशासह बाहेरील देशातूनही भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेणे अशक्यप्राय झाले होते. त्यांना लॉकडाऊनच्या काळातही घरबसल्या अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱयांनी ऍप्लिकेशन तयार करून ऑनलाईन लाईव्ह दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात यंदाच्या वर्षी दि.5 एप्रिल ते 25 एप्रिल 2021 या 20 दिवसांच्या काळात ऍप्लिकेशनव्दारे सुमारे 29 लाख 81 हजार 604 भाविकांनी घरबसल्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. तसेच याच काळात 20 दिवसांमध्ये 8 लाख 64 हजार 826 भाविकांनी ऍप्लिकेशनव्दारे ऑनलाईन जोतिबाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
दरम्यान, गतवर्षी एप्रिल 2020 या महिन्यात 40 लाख 32 हजार 765 इतक्या स्थानिक, देशासह देशाबाहेरील भाविकांनी ऍप्लिकेशनव्दारे अंबाबाई देवीच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची तांत्रिक विभागाचे कर्मचारी अंबाबाई देवीचे ऑनलाईन दर्शनाचा लाभ स्थानिक, राज्य, देश व जागतिक पातळीवरील भाविकांना मिळावा, यासाठी अविरत परीश्रम घेत आहेत.
लाईव्ह अंबाबाई दर्शन ऍप्लिकेशव्दारे अंबाबाई देवीचे इतक्या भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ :
(5 एप्रिल ते 25 एप्रिल 2021 या काळातील अंबाबाईचे दर्शन घेतलेल्या भाविकांची 20 दिवसातील अनुक्रमे प्रत्येक दिवसाची संख्या)
5 एप्रिल – 1 लाख 34 हजार 256, 6 एप्रिल – 1 लाख 78 हजार 905, 7 एप्रिल – 1 लाख 66 हजार 542, 8 एप्रिल – 1 लाख 78 हजार 431, 9 एप्रिल – 1 लाख 56 हजार 321, 10 एप्रिल – 1 लाख 78 हजार 540, 11 एप्रिल – 1 लाख 23 हजार 984, 12 एप्रिल – 1 लाख 45 हजार 239, 13 एप्रिल – 1 लाख 33 हजार 245, 14 एप्रिल – 1 लाख 29 हजार 664. 15 एप्रिल – 1 लाख 54 हजार 289, 16 एप्रिल – 1 लाख 22 हजार 390, 17 एप्रिल – 1 लाख 21 हजार 569, 18 एप्रिल – 1 लाख 44 हजार 327, 19 एप्रिल – 1 लाख 39 हजार 654, 20 एप्रिल – 1 लाख 35 हजार 620, 21 एप्रिल – 1 लाख 23 हजार 778, 22 एप्रिल – 1 लाख 23 हजार 886, 23 एप्रिल – 1 लाख 12 हजार 384, 24 एप्रिल – 1 लाख 34 हजार 869, 25 एप्रिल – 1 लाख 43 हजार 705. एकुण 20 दिवसात 29 लाख 81 हजार 604 भाविकांनी ऍप्लिकेशनव्दारे अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
(5 एप्रिल ते 25 एप्रिल 2021 या काळातील जोतिबाचे लाईव्ह दर्शन घेतलेल्या भाविकांची 20 दिवसातील अनुक्रमे प्रत्येक दिवसाची संख्या)
5 एप्रिल 70 हजार 654, 6 एप्रिल – 66 हजार 324, 7 एप्रिल – 55 हजार 421, 8 एप्रिल – 23 हजार 498, 9 एप्रिल – 43 हजार 780, 10 एप्रिल – 25 हजार 734, 11 एप्रिल – 35 हजार 907, 12 एप्रिल – 34 हजार 779, 13 एप्रिल – 45 हजार 210, 14 एप्रिल – 37 हजार 551, 15 एप्रिल – 65 हजार 310, 16 एप्रिल – 34 हजार 779, 17 एप्रिल – 37 हजार 442, 18 एप्रिल – 34 हजार 96, 19 एप्रिल – 31 हजार 668, 20 एप्रिल – 55 हजार 907, 21 एप्रिल – 45 हजार 218, 22 एप्रिल – 43 हजार 218, 23 एप्रिल – 32 हजार 789, 24 एप्रिल – 45 हजार 217, 25 एप्रिल – 33 हजार 217. अशा एकुण 20 दिवसात 8 लाख 64 हजार 826 भाविकांनी ऍप्लेकशनव्दारे ऑनलाईन घरबसल्या जोतिबाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
गतवर्षी अंबाबाई ऍप्लिकेशनव्दारे अंबाबाई देवीचे इतक्या भाविकांनी लाईव्ह दर्शनाचा लाभ घेतला.
लाईव्ह ऑनलाईन दर्शन घेतलेल्या भाविकांची (जानेवारी ते डिसेंबर 2020) प्रत्येक महिन्याची अनुक्रमे संख्या अशी, जानेवारी 2020 – 34 लाख 21 हजार 895, फेब्रुवारी – 37 लाख 65 हजार 432, मार्च – 39 लाख 76 हजार 432, एप्रिल – 40 लाख 32 हजार 765, मे – 66 लाख 45 हजार 324, जून – 56 लाख 34 हजार 213, जुलै – 54 लाख 27 हजार 509, ऑगस्ट – 45 लाख 22 हजार 187, सप्टेंबर – 42 लाख 65 हजार 807, ऑक्टोबर – 41 लाख 55 हजार 489, नोव्हेंबर – 35 लाख 78 हजार 508, डिसेंबर – 45 हजार 21 हजार 320.