बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी ऑक्सिजनची क्षमता भासत आहे. दरम्यान बेंगळूरमध्ये रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. बेंगळूर प्रशासनाचा काटेकोरपणा असूनही शहरातील ऑक्सिजनचा काळाबाजार बंद होत नाही. एकीकडे रुग्णांचे ऑक्सिजन अभावी जीव जात असताना दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठा करणारे काळाबाजार करताना दिसत आहेत. एक ऑक्सिजन सिलिंडर दहापट किंमतीत विकणाऱ्या ऑक्सिजन एजन्सी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. तो ३०० रुपयांचे सिलेंडर ३ हजार रुपयातला विकत होता.
दरम्यान केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) पीन्या औद्योगिक क्षेत्रात खासगी गॅस एजन्सीवर छापा टाकला आणि प्रभारी रवी कुमार (वय ३६) या व्यक्तीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ३०० रुपये किंमतीचे ४७ लिटरचे ऑक्सिजन सिलेंडर ३ हजार रुपयांत विकत होते. त्याला अटक करून चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.









