शिरोळ लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ प्रतिनिधी येथील दुय्यम कार्यालयातील दुय्यम निबंधक पी एन साळुंके वय वर्ष 57 मुळगाव उस्मानबाद सध्या जयसिंगपूर यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की पुरुष तक्रारदाराने 9 जून रोजी बक्षीस पत्र केले होते त्यानंतर बक्षीस पत्र्याच्या दस्ताची मागणी केली संबंधित अधिकाऱ्यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारदारांनी सोमवार दि 21 रोजी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात कोल्हापूर येथीललाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार केली होती त्या अनुषंगाने आज मंगळवार दि 22 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला संबंधित तक्रारदाराने दोन हजाराची लाच साळुंके यांना देताना रंगेहात पकडले त्यांच्या विरोधात शॅडो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम ,सुनील घोसाळकर, सुरज अपराध यांनी केली.









