बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्याणराज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलतीने बेडची कमतरता भासत आहे. बीबीएमपीला कोविड -१९ रूग्णांवर उपचार करण्यासाठी ११ हजार रुग्णालय बेडची आवश्यकता आहे, परंतु आतापर्यंत ते फक्त ९ हजार बेड उपलब्ध झाले आहेत. उर्वरित २ हजार बेड दोन दिवसात उपलब्ध करुन देण्यात येतील, असे आश्वासन बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी दिले.
माध्यमांशी बोलताना मुख्य आयुक्त गुप्ता यांनी इतर शहरांच्या तुलनेत आरोग्याची चांगली पायाभूत सुविधा असूनही कोविड संसर्गाच्या अचानक वाढीमुळे बेंगळूर गोंधळून गेलं आहे.