ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशियाने हल्ला केल्याने युक्रेनमध्ये अतिशय चिंताजनक स्थिती आहे. या युद्धात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. काही जणांना भारतात आणले, तर काही जण अद्यापही परतीची वाट पाहत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
युक्रेन आणि रशियातील तणाव वाढत असून आज युद्धाच्या चौथ्या दिवशीही हल्ले होत आहेत. अशा परिस्थिती युक्रेनमधून आत्तापर्यंत 16 भारती नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान भारत सरकारने भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ या मिशनची सुरुवात केली आहे.
युद्धग्रस्त युक्रेनमधून आत्तापर्यंत 709 भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 250 नागरिकांना रविवारी आणि 219 नागरिकांना शनिवारी संध्याकाळी दिल्लीत पोहचवण्यात आले. या युद्धजन्य परिस्थिती भारतीय दूतावासाने एक अॅडव्हायजरी जाहीर करत भारतीय नागरिकांना सीमेवर न जाण्याचे आवाहन केले आहे.
ऑपरेशन गंगा अंतर्गत आम्ही 1000 भारतीयांना मायदेशी परत आणत आहोत. अजूनही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणले जात आहे. भारत सरकार त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. जिथे कुठेही अडचण असेल, तिथे आम्ही आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.