बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये २४ डिसेंबरच्या रात्रीपासून ११ ते ५ या वेळेत राज्यभर नाईट कर्फ्यू लागू केल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे. हा कर्फ्यू २ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असले असे त्यांनी म्हंटले आहे. अलीकडे नवीन कोरोना रुग्ण सापडत असल्याने हा कर्फ्यू लावण्यात येत असल्याचे येडीयुरप्पा म्हणाले.
कोरोना विषाणूचा नवीन ताण आणि भारत सरकार आणि तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार आजपासून २ जानेवारीपर्यंत रात्रीचे कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा कर्फ्यू ८ दिवस असेल आणि संपूर्ण राज्यात लागू होईल, असे येडीयुरप्पा म्हणाले. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी नव्या नियमांवर प्रकाश टाकताना त्यांनी या सर्वांनी प्रवासापूर्वी २४ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र घेऊन प्रवास करावा, असे म्हंटले आहे.









