बेंगळूर /प्रतिनिधी
केंद्रसरकारने देशात नवीन शिक्षण धोरण लागू केलं आहे. कर्नाटक राज्यात २० ऑगस्ट पर्यंत नवीन शिक्षण धोरण लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे नवीन शिक्षण धोरण २०२० लागू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय मंजूर केला. शुक्रवारी शिक्षण विभागाच्या अधिकारी व तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी कर्नाटक शिक्षण धोरण राबविण्यासाठी १५ दिवसांचे ध्येय निश्चित केले आहे. नवीन शिक्षण धोरण लागू करण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे.
कुमार यांनी कर्नाटक सरकारच्या वतीने माजी इस्रो प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे आभार मानले आहेत. कस्तुरीरंगन यांनी एनईपी गेल्या काही वर्षांत देशाचा वेगाने विकास करण्यास मदत करेल. केरळ ही माझी जन्मभूमी असले तरी कर्नाटक हे माझे राज्य आहे, असे ते म्हणाले. कर्नाटक हे आधीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे.









