बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक नवीन मंत्रिमंडळ विस्तारावरून काही मंत्री नाराज आहेत. त्यांनी याआधी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. यांनतर या नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कला गेला आहे. यासर्व घडामोडीनंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, जे कर्नाटकातील पक्षाचे प्रभारी आहेत, ते सोमवारी बेंगळूरमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आले आहेत. ते चार दिवसात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
दरम्यान बेंगळूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले की, “राज्य सरकार चांगले काम करत आहे. आणि २०२३ च्या निवडणुकीत भाजप बहुमत मिळवेल आणि परत सत्तेत येईल.”
अरुणसिंह हे ३१ ऑगस्ट रोजी म्हैसूर, म्हैसूर ग्रामीण आणि चामराजनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
त्यांनतर १ सप्टेंबर रोजी ते हसन आणि मंड्या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. २ सप्टेंबर रोजी ते पक्षाच्या बेंगळूर, उत्तर, दक्षिण आणि मध्य विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. ३ सप्टेंबर रोजी सकाळी दिल्लीला परतण्यापूर्वी तो हुबळीतील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.