काबुल: अफगाणिस्तानवरून ८७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान आज (रविवार)पहाटे दिल्लीत दाखल झालं. या नागरिकांना काल(शनिवारी) भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेलं गेलं होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-१७ या विमान देखील काबूलहून १६८ नागरिकांना घेऊन भारतात परतलं आहे.
यामध्ये अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील C-१७ विमानाने भारतात परतले आहेत. तसेच यामध्ये २३ अफगाणी शीख नागरिक सहभागी आहेत. हे विमान आज गाजियाबाद हिंडन आयएएफ बेस वर उतरलं असल्याची सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने माहिती दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









