बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक १५ मार्चला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. कर्नाटक विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष एस.एल. धर्मेगौडा यांच्या निधनानंतर रिक्त असणारी जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
पोटनिवडणुकीची अधिसूचना २५ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च आहे. पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे. निवडणूक १५ मार्च रोजी होणार आहे. १५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत आमदारांनी मतदान करायला हवे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार १५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी होणार असून विधानपरिषदेची पोटनिवडणूक १८ मार्चपर्यंत पूर्ण होईल.









