ऑनलाईन टीम/तरुण भारत
तब्बल १४ वर्षानंतर देशात माचिसच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे माचिससाठी आता १ रुपयांऐवजी २ रुपये मोजावे लागणार आहेत. माचिसच्या वाढलेल्या किंमती १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. कच्चा मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होतेय त्यामुळे माचिस तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ग्राहकांनी ३६ काड्या मिळायच्या. मात्र आता २ रुपयांच्या माचिसच्या बॉक्समध्ये ३६ माचिसच्या काड्यांऐवजी ५० काड्या मिळणार आहेत.