नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परस्थितिचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. याक्षणी संपूर्ण लॉकडाउनची गरज नाही, नाईट कर्फ्यू पुरेसा आहे. नाईट कर्फ्यूला ‘कोरोना कर्फ्यू’ हा शब्द वापरला पाहिजे. यामुळे लोकांमध्ये योग्य संदेश जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. तसेच या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना ‘लसमहोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले.
११ एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या दरम्यान आपण सर्वजण ‘लसीकरण उत्सव’ साजरा करूया, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. तसेच लसीकरण महोत्सवात जास्तीत जास्त लोकांना लसी द्यावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी देशातील तरूणांना अशी विनंती करतो की तुमच्या आसपास ज्यांचे वय ४५ वर्षांपुढे आहे त्यांना लसीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.
या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वयाने काम करावे त्यातूनच करोनावर मात करणे शक्य आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
Previous Articleबीडच्या दाम्पत्याची अमेरिकेत चाकूने भोसकून हत्या
Next Article कोरोनाचा कहर! दिल्लीत उच्चांकी रुग्ण वाढ









