बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दरम्यान १०० वर्षांहून अधिक आयुष्यमान असणाऱ्या राज्यातील तीन महिलांनी (कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील कोरोनावर १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन स्त्रिया) कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे.तिन्हीही रुग्ण चित्रदुर्ग जल्ह्यातील आहेत. रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर तीनही महिला निरोगी जीवन जगत आहेत.
१०५ वर्षीय चिथीरम्मा यांना कोरोना झिटिव्ह आल्यानंतर २८ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर कोरोना अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांना १ ऑक्टोबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.एवढे वय असून सुद्धा त्या कोरोनाहून बरे होण्यात घरी परतल्या.
चित्रदुर्गातील ११० वर्षीय सिद्धम्माने कोरोनाला पराभूत केले. कुटुंबातील इतर सदस्यांसह सिद्धम्मा यांनाही २७ जुलै रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. रूग्णालयात भरती झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वयाच्या या टप्प्यावरही मधुमेह किंवा उच्च रक्तदाब याचा कोणताही त्रास त्यांना नाही.
तर वयाच्या १०० व्या वर्षी, गोविंदम्मा यांनी हे देखील कोरोनावर विजय मिळविला आहे. मुलगा, सून आणि नातू यांच्यासमवेत २५ जून रोजी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचारानंतर अहवाल नकारात्मक आल्यानंतर सर्वांना ६ जुलैला रुग्णालयातून सोडण्यात आले.









