क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
कसमशेळ-बेतोडा-फोंडा येथील ॐ नित्य दिव्य योगाश्रमतर्फे प. पू. श्री बह्मानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या अखिल गोवा योगासन स्पर्धेत आदी दाभोलकर, रश्मी नावेलकर, अरीफ खान, याशिका चेवली, अभिनव पांडे व फरजिन जकाती तर सूर्यनमस्कार स्पर्धेत विद्यार्थ लोटलीकर व आश्विनी चुरी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-6 ते 10 वर्षे वयोगट, कुमार अ गट-आदी दाभोलकर, विद्यार्थ लोटलीकर, वृशांग नार्वेकर, उत्तेजनार्थ- ओम गोवेकर, दक्षेश राव, कुमारी अ गट-रश्मी नावेलकर, कात्यानी होन्नावरकर, गार्गी नाईक, उत्तेजनार्थ-अवनी गावकर, तसू मन्ना, 11 ते 15 वर्षे-कुमार अ गट-अरीफ खान, टी. के. मेघनाथ, रफीक हजारेसाब, उत्तेजनार्थ-यश शिरोडकर, शौर्य भगत, कुमारी गट-याशिका चेवली, आश्नी भट, सरमळकर, मनस्वी दास, उत्तेजनार्थ-कोमल कुलाल, स्वरा प्रभू गावकर, 16 ते 25 वर्षे-कुमार गट-अभिनव पांडे, लौकीक गावडे, आशिषकुमार पळ, उत्तेजनार्थ-सौरभ, सिद्धेश नाईक, कुमारी गट-फरजिन जकाती, आश्विनी चुरी, तेजस सतरकर, उत्तेजनार्थ-प्रेमलता गौतम, अक्षता हळर्णकर. सूर्यनमस्कार स्पर्धा-कुमार गट-विद्यार्थ लोटलीकर, आरीफ अल्लाऊद्दिन खान, आदी दाभोलकर, उत्तेजनार्थ-दिव्यत्व जल्मी, आशिषकुमार पळ, कुमारी गट-आश्विनी चुरी, श्वेता मौर्य, अद्विता सेवगावकर, उत्तेजनार्थ-रीमा पाटील, याशिका चेवली. दरम्यान योगाश्रमातील साधक, साधिका व मुलांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंचाहत्तर करोड सूर्यनमस्कार मोहिमेत घालण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत दिव्या गावडेने प्रथम, मंथन नाईक द्वितीय, जयराज नीवजेकर तृतीय तसेच योगीराज नाईक, योगीराज गावडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. साधिकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत रक्षा गावडेने प्रथम, सुनिता गावस द्वितीय, पूजा नाईक तृतीय तर शितल कुबल व तृप्ती धोंड यांनी उत्तेजनार्थ तसेच साधकांच्या स्पर्धेत मनोज नाईकने प्रथम, नमेश नाईक द्वितीय, आनंद कुंकळीकर तृतीय तर राजेंद्र गावडे व साबाजी नेवरेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वडोदरा-गुजरातचे प. पू. श्रद्धानंदस्वामी, ॐ नित्य दिव्य योगाश्रमाचे गुरुवर्य जयवंतभाऊ तसेच हरिश्चंद्र नाईक, महादेव पटेकर, ईश्वर कुबल, संजीव नाईक, जयकुमार कुबल, रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते. समारोप सोहळय़ाला श्रद्धानंदस्वामी, योगसेवा मंगल प्रतिष्ठानचे संदेश बाराजणकर, विश्वहिंदू परिषद गोमंतक व प. पू. पद्मनाभ शिष्य संप्रदायचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक, गुरुवर्य जयवंतभाऊ, ईश्वर कुबल, संजीव नाईक, जयकुमार कुबल हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संजीव नाईक यांनी केले. जयकुमार कुबल यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्योत नाईक यांनी तर योग स्पर्धेतील सूत्रसंचालन सत्यपाल नाईक यांनी केले.









