प्रतिनिधी/ रत्नागिरी
एका बाजूला एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असतानाच जिह्यात श्gाक्रवारी 100 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े यामध्ये एकूण 800 प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतल्याची नोंद झाली आह़े दरम्यान शुक्रवारी नव्याने 118 कर्मचारी कामावर हजर झाले असून रत्नागिरी विभागात कामावर हजर झालेल्या कर्मचाऱयांची एकूण संख्या 361 झाली आह़े
शुक्रवारी दापोली आगारातील 30, खेडमधून 4, चिपळूण 30, देवरूख 28, तर राजापूर 16 अशा बसफेऱया सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र रत्नागरी, गुहागर, मंडणगड व लांजा येथून बसफेऱया अद्याप सुरू झालेल्या नाहीत़ शनिवारी या ठिकाणाहूनही बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली. एसटीच्या फेऱया टप्प्याटप्प्याने सुरू होत असून प्रवाशांचाही त्याला प्रतिसाद दिसून आल़ा राज्यभर काही कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरूवात झाली आह़े शुक्रवारी एकूण 4 हजार 271 कर्मचाऱयांपैकी 361 कर्मचारी हजर राहिल़े यामध्ये प्रशासकीयमधील 137, कार्यशाळेतील 93, चालक 97, वाहक 34 अशा कर्मचाऱयांचा समावेश आहे.
दापोलीत संपामध्ये फूट
दापोलीः शासनाने दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव मान्य करत दापोली आगारातील 14 एसटी कर्मचाऱयांनी शुक्रवारपासून आपली सेवा बजावली. यामुळे आगारातून 7 गाडय़ा तालुक्यात रवाना झाल्या. यामुळे दापोली आगारातील एसटी संपात फूट पडल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱयांना 41 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव ठेवत शुक्रवार सकाळपर्यंत कर्मचाऱयांना सेवेवर रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दापोली आगारातील 14 चालक, वाहकांनी शुक्रवारपासून आपली सेवा पूर्ववत सुरू केली. शुक्रवारी दापोली आगारातून दाभोळ, उसगाव, हर्णे, बुरोंडी, मुरुड, कादिवली व वाकवली मार्गे गावतळे आदी फेऱया रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली.
चिपळूणातून रत्नागिरी, पोफळी बसफेरी रवाना
चिपळूणः एस. टी. महामंडळाच्या संपावर असलेल्या कर्मचाऱयांना सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. चिपळूण आगारातील 480 चालक-वाहकांपैकी केवळ 12 कर्मचारी हजर झाले. नव्याने रत्नागिरी तसेच पोफळी बसफेरी शुक्रवारी रवाना झाली.
राज्याप्रमाणेच चिपळूण आगारातील कर्मचारी संपावर ठाम आहेत. यावेळी माध्यमाशी बोलताना संपकरी कर्मचारी म्हणाले की, सरकारने दिलेली पगारवाढ फसवी आहे. 1 वर्ष आणि 10 वर्षे सेवा झालेल्यालाही 5 हजार तर 30 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱयांना फक्त अडीच हजार रूपये पगारवाढ हा कोणता न्याय, असा प्रश्न उपस्थित केला. सातवा वेतन आयोग देण्यासाठी तयार झालेले परिवहन मंत्री शब्द फिरवून तुटपुंजी पगारवाढ जाहीर करतात ही निव्वळ फसवणूक असल्याचे सांगत एस्टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. एकीकडे पगारवाढीनंतर कर्मचाऱयांना हजर होण्याचे आवाहन सुरु असताना दुसरीकडे चिपळूण आगारातील 480 चालक-वाहकांपैकी केवळ 12 हजर झाले आहेत. शुक्रवारी दोन गाडय़ा रत्नागिरीच्या दिशेने तर एक सकाळी 6.30 वाजता पोफळी मार्गावर धावली.
गुहागरात हजर झालेल्या 4 पैकी दोघांनाच डय़ुटी
खेडः एसटी कर्मचाऱयांच्या संपाच्या अठराव्या दिवशी तीन चालक व एक वाहक हजर झाल्याने शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता बसस्थानकात दोन एसटी बसेस धावण्यासाठी उभ्या राहिल्या. मात्र दोन वाहकांअभावी दोन चालकांना डय़ुटी न मिळताच परतावे लागले. एक एसटी बस आगारात उभी करावी लागली. अन्य दोन चालक-वाहकांनी खेड-चिपळूण मार्गावर बसफेरी सोडली. या बसच्या अवघ्या दोन फेऱया धावल्या.









