गुरुग्राम :
हरियाणातील बादशाहपूर येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद (45) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दौलताबाद यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. गुरुग्राममधील समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. 2019 मध्ये राकेश दौलताबाद यांनी भाजपचे उमेदवार मनीष यादव यांचा पराभव करत विजय संपादन केला होता. हरियाणा लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानच आमदाराच्या दु:खद निधनाची घटना समोर आली आहे. राकेश दौलताबाद हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बादशाहपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते.









