वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटार इंडियाने देशात कार निर्मिती करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात देशात निर्मिती करण्यात आलेल्या क्रेटाची जागतिक बाजारातील निर्यात जवळपास 2 लाखाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती हय़ुंडाई मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस किम यांनी दिली आहे.
हय़ुंडाईच्या क्रेटाचे लाँचिंग 2015 मध्ये करण्यात आले होते. तेव्हापासून सदरचे मॉडेल हे ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. यामुळे आगामी काळातही ही विक्रीची घोडदौड कायम ठेवण्याचे कंपनीचे ध्येय असल्याचेही स्पष्ट केले आहे. तामिळनाडूमधील प्रकल्पामध्ये उत्पादन वाढवण्याची तयारी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वर्ष 2019 मध्ये हय़ुंडाई मोटारने भारतात 1 लाख 81 हजार 200 कार्सची निर्यात केली होती.









