नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटर ग्रुपमध्ये येणाऱया हय़ुंडाई मोटर कंपनी व किया कॉर्पच्यावतीने अमेरिकेत 7.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार असल्याचे समजते. सदरची गुंतवणूक ही इलेक्ट्रीक वाहनांच्या विकासाकरीता केली जाणार असल्याचे हय़ुंडाईकडून सांगितले जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत अमेरिकेसह इतर देशात झालेली वाढ पाहून हय़ुंडाईने हा निर्णय घेतला आहे. ही गुंतवणूक इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादन, विकासाकरीता टप्प्याटप्प्याने 2025 पर्यंत केली जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.









