नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये पेटा या गाडीची सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. कंपनीने मागच्या वर्षी 32 हजार 799 वाहनांची निर्यात केली आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये निर्यातीत 26 टक्के इतकी वाढ दिसली आहे. 2020 मध्ये 25 हजार 995 क्रेटाची निर्यात केली होती. एकंदर वाहनांच्या निर्यातीचा आकडा 2021 मध्ये कंपनीचा 42 हजार 238 इतका होता.









