होसाकोटे/प्रतिनिधी
होसाकोटचे अपक्ष आमदार शरथ बच्चेगौडा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शरथ बच्चेगौडा यांनी एक फेसबुक पोस्ट टाकत आपण स्वतः आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे. आमदार शरथ यांनी म्हंटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना संक्रमित भागाचा दौरा करीत होते आणि दोन दिवसांपूर्वी त्यांना तीव्र वेदना होत होत्या, त्यानंतर त्यांनी पत्नीसह आपली तपासणी केली यामध्ये त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बच्चेगौडा यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना स्वेच्छेने स्वत: ची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
याआधी अभिनेत्री आणि मांड्या मतदार संघाच्या खासदार सुमलथा अंबरीश आणि कॉंग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही कोरोनाची लागण झाली आहे.









