प्रतिनिधी / बेळगाव
होळी आणि रंगपंचमी सणानिमित्त शांतता सभा कॅम्प येथील पोलीस स्थानकामध्ये घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पी. आय. प्रभाकर धरमट्टी होते.
होळी उत्सव व रंगपंचमी साजरी करतेवेळी काविड व मोजकेच जण राहावे, गट करून व अन्य धर्मीय नागरिक व गाडीवर रंग वगैरे टाकू नये, अन्य लोकांना याचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, रंगपंचमीला गालबोट लावू नये तसेच कायद्याचे उल्लंघन करू नये, अशा सूचना करण्यात आल्या. या सभेत एएसआय प्रभाकर डोळ्ळी, हवालदार आर. एस. पुजारी, अल्लाउद्दीन बेपारी, दीपक भाटी, शामलाल धनवार, विठ्ठल वड्डर, दुर्गादास कामाटे, किशोर खोकले, आणि इतर मंडळाचे कार्यकर्ते व अन्य धर्मीय नागरिक उपस्थित होते.









