होळी सणाचा आठवडा सुरू होतोय. होलिकादहन, धुळवड, रंगोत्सव आणि बरेच काही सोहळे रंगणार आहेत. माणसाच्या जीवनात रंग भरणारा हा सण दरवषी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या वषीही हाच आनंद आणि उत्साह कायम आहे पण त्यात भर पडली आहे, ती सावधगिरीच्या संदेशांची. कोरोना अर्थात कोविड सारख्या महाभयानक रोगांच्या पार्श्वभूमीवर रंग उधळणीत सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. नायक, अभिनेते आणि राजकारणी लोकांनी देश आणि राज्य पातळीवरील सामुदायिक होळी मीलन कार्यक्रम रद्द करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेऊन नागरी आरोग्याला महत्व दिले आहे.
दरवषी होळीचा सण आला की ‘पाणी वाचवा’चे संदेश येतात. यंदा ‘स्वतःला वाचवा’ चे संदेश फिरू लागले आहेत. विशेषतः संक्रमण होतील अशा आजारापासून सावध होण्याचा सल्ला दिला जातोय. सध्या ही गरजही आहे. कोरोनासारख्या आजारांनी साऱया जगाला अडचणीत आणलेले असताना आपण सावध होणे गरजेचे आहे. चायना मेड रंगांचा वापर धोकादायक ठरू शकतो याचाही विचार करून आपण सर्वांनी देशी किंवा नैसर्गिक रंगावर भर देऊन रंगोत्सव साजरा करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर सध्या जागृतीच्या संदेशांचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. रंगोत्सवात कोरोनासारख्या रोगांपासून बचाव कसा करायचा याबद्दलची जागृती केली जात आहे. त्यातच यंदा होळीला जास्त बाहेर किंवा हजारोंच्या गर्दीत नको असे संदेश पसरत असून याचा नेमका कितपत परिणाम दिसणार याबद्दल मात्र साशंकता जास्त आहे. हा उत्सव आपण सण म्हणून साजरा करतो. या उत्सवाशी आपल्या अनेक परंपरा जोडलेल्या आहेत. यामुळे सण साजरा करताना जास्त बंधने घालून घ्यायची नाहीत असा एक मतप्रवाह आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक विशेषतः तरुणाई हा उत्सव तितक्याच उत्साहात साजरा करेल, दरम्यान आरोग्याची काळजी म्हणून तोंडावर मास्क येतील, अशी एक शक्मयता दिसतेय.
दरवषी हा सण परीक्षांच्या मोसमात येतो. यामुळे दहावी आणि बारावी सारख्या महत्वाच्या वर्षात असलेल्या आणि परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना या सणापासून काहीसे अलिप्त राहावे लागते. या पार्श्वभूमीवर या वषीही परीक्षेत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सणाच्या आनंदावर पाणी सोडावे लागेल. मात्र आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांना हे करावेच लागणार आहे. सण पुढच्या वषी अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल, तो पर्यंत महाभयानक कोरोनाचे संकटही टाळलेले असेल, त्यामुळे ‘या वषी होळी जरा जपूनच’ हा सल्ला सध्या जोरदारपणे दिला जातोय.









