दार उघड वाहिनी दार उघड म्हणत सुरु झालेला होम मिनिस्टर चा हा प्रवास गेली 16 वर्ष अविरत मनोरंजन करीत आहे, लग्न झालेल्या समस्त महिला वर्गासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा होम मिनिस्टर घरच्या घरी च्या माध्यमातून आदेश भावोजी तमाम महाराष्ट्रातील वहिनींची ऑनलाईन भेट घेत होते.
आता पुन्हा होम मिनिस्टर चा हा पॅमेरा वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज झालाय, आदेश भावोजी परत वहिनींना दार उघड वाहिनी दार उघड अशी साद घालणार आहेत, पण ती वहिनींच्या सासरी नाही तर माहेराला. आता आदेश भावोजी येणार पण माहेराला, आणि एक नाही तर दोन वहिनींमध्ये रंगणार खेळ पैठणीचा. या नवीन पर्वात आदेश भावोजी वहिनींच्या माहेराला जाऊन तिकडे पैठणीचा खेळ खेळतील, माहेराला जाऊन वाहिनीच्या लहानपणीच्या गमती जमती, लग्नाआधी कुटुंबासोबत असलेले भावनिक ऋणानुबंध, ह्यांना उजाळा देतील. ह्यावेळी मिस्टर त्यांच्या सासरी वहिनींसोबत असतील. या निमित्ताने अनेक वर्षानंतर आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक महेंद्र कदम ही जोडी पुन्हा एकत्र आलेय. इतकी वर्ष होम मिनिस्टरचे भाग सासरी साजरे केले. येत्या सोमवारपासून होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणींचा पाहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता झी मराठीवर प्रसारित होते.









