नवी दिल्ली
गृहकर्ज पुरवठा करणारी कंपनी होम फर्स्ट फायनान्स येणाऱया काळात रोख्यांच्या माध्यमातून 99 कोटी रुपये उभारणार आहे. सदरची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. खासगी स्तरावर रोखे उपलब्ध करत त्याआधारे 99 कोटी रुपये उभारण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. सदरच्या प्रस्तावाबाबत सोमवार दि. 22 नोव्हेंबरला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीचा निर्णय होणार आहे.









