प्रतिनिधी / नागठाणे
लॉकडाऊन शिथीलतेने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. नागठाणे (ता.सातारा).येथेतर आता दररोजच आठवडा बाजार भरू लागला आहे. यामध्ये सातारा व पाटण तालुक्यातील विविध गावातील लोक या बाजारपेठेत येत आहेत. या गर्दीचा फायदा घेत हातावर होमक्वारंटाइनचे शिक्के मारलेले अनेक लोक बाजारात खुलेआम फिरताना दिसत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी “होमक्वारंट असलेल्यानं आवरा नाहीतर आम्ही दुकाने बंद करतो ” असे गाऱ्हाणे ग्राम सुरक्षा समितीकडे मांडले .यामुळे ग्रामसुरक्षा समितीने नागठाणे बाजारपेठ अनिश्चित काळा साठी पूर्ण बंद केली आहे.
सातारा व पाटण तालुकातंर्गत अनेक लोक आपल्या मूळ गावात परतत आहेत. त्यांना होम क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अन्य राज्य, जिल्ह्यातून येताना संबंधितांची आरोग्य तपासणी व अधिकृत परवाने असल्याशिवाय त्यांना तालुक्यात प्रवेश दिला जात नाही. तालुक्यात येणाऱ्यांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्याची अधिकृत नोंद व हातावर शिक्का मारून होम क्वारंटाइन होणे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहे. इतर राज्य व अन्य जिल्ह्यातून सातारा व पाटण तालुक्यात येणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. चोरीछुपे येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असे असताना कोणी बेकायदेशीरपणे आला तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मात्र।सध्या लॉकडाऊन मधील शिथीलतेमुळे नागठाणे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत ज्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आले आहे, असे लोकही बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यांच्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो. अशावेळी एक रुग्ण जरी सापडला तरी बधितांची भलीमोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागठाणे चा वनवासमाची पॅटर्न होण्यास वेळ लागणार नाही.
त्यामुळे येथील व्यवसायिकांनी ग्रामसुरक्षा समितीकडे याबाबत तक्रार केली होती.ग्रामसुरक्षा समितीने बाजारपेठेत होणारी गर्दी पाहून तात्काळ बाजारपेठ अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.तसेच गावचे सर्व रस्तेही बंद करण्यात आले असून प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतीने आपले कर्मचारी नेमुन चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








