प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभीळ पांगारी येथे फणसू आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून शिवीगाळ करणाऱ्या दाभिळ पांगारी येथील संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
होमकॉरंटाईन शिक्का मारण्यास गेले असताना हा प्रकार घडला आहे. आरोग्य रुग्णांची तपासणी करून त्याला होमकॉरंटाईनचा शिक्का मारण्यासाठी गेलेल्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून शिक्का मारण्यास अटकाव केल्याच्या आरोपावरून दाभिळ पांगारी येथील संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली फणसु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक रावसाहेब हंकारे हे व आरोग्य विभागाचे इतर कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे दापोली येथे संशयिताच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांनी संशयिताची वैद्यकीय तपासणी करून होमकॉरंटाईनचा शिक्का मारणे करिता गेले असता संशयिताने हंकारे यांना तुम्ही डॉक्टर आहात की सरकारी नोकर असे विचारून त्यांचेशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आरोग्यसेवक आपले सार्वजनिक कार्य पार पाडीत असताना त्यांना विरोध करून होमकॉरंटाईनचा शिक्का मारण्यास अटकाव केला व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून संशयिताच्या विरोधात भादवी 186, 187, नैसर्गिक आपत्ती 2005 कलम 51 (5) अव्वये गुन्हा दाखल करण्याचा आला आहे. उन्हवरे दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मंदार हळदे करीत आहेत.