महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
योगिनी चित्रलेखेने तामसी विद्येचा वापर करून अनिरुद्धाला मोहित केले. तो तात्काळ एखाद्या का÷ाप्रमाणे आपल्या मंचकावर पहुडला. चित्रलेखेने भवानीशंकराचे स्मरण केले व अनिरुद्धासह तो मंचक आपल्या डोक्मयावर घेतला. आकाश मार्गे ती बाणासुराच्या शोणितपूर नगरीत पोहोचली. ती थेट उषेच्या महालात पोहोचली व तिथे तिने उषेसमोर तो मंचक डोक्मयावरून उतरवला. ती आनंदाने उषेला म्हणाली – हे प्राणसखे! हा पहा तुझा प्राणवल्लभ! याला ओळखलेस काय? उषा तत्परतेने उठली व अनिरुद्धाच्या मंचकाजवळ आली. अनिरुद्धाच्या चेहऱयावर झाकलेले वस्त्र तिने हळूच दूर केले व तो चेहरा पाहिला. अनिरुद्धाचा चेहरा पाहताच तिची खात्री पटली की हाच माझा प्राणवल्लभ. हाच माझ्या स्वप्नात आला होता. याच्याबरोबरच मी रतिक्रीडा केली होती. हाच माझा पति होय. तिचा आनंद गगनात मावेना. चित्रलेखेला तर कुठे ठेवू व काय देऊ असे तिला झाले. ती चित्रलेखेला म्हणाली – हे साजणी! तू दुर्बळांची माताच आहेस. या निर्वाणीच्या प्रसंगी तुझ्या रुपाने मला भवानीच पावली. तुझ्या उपकारातून मी कशी उतराई होणार? तुला मी काय दिल्याने तुझ्या उपकाराची परतफेड होईल? असा कोणताही पदार्थ मला दिसत नाही. असे म्हणून तिने अत्यंत प्रेमाने चित्रलेखेचे चरण धरले. चित्रलेखेने तिचे बाहू धरून तिला उठवले व म्हटले – जशी शंकर गौरी तसा आता तुम्ही एकमेकाचा भोग घ्या. आता अनिरुद्ध जागा होईल तेव्हा लाजून दूर राहू नकोस, सेवेसाठी सज्ज राहा. स्त्रीसंग फार मादक असतो. मदिरेचा अम्मल काही तासात उतरतो पण स्त्रीसंगाची मोहकता मनात आयुष्यभर राहते व पुरुषाला बांधून ठेवते. त्यानंतर चित्रलेखेने उषेला प्रणय करून अनिरुद्धाला कसे बांधून ठेवावे याचे मार्गदर्शन केले.
इत्यादि ललनालाघवयुक्ति । चित्रलेखेनें उषेप्रति ।
बोधूनि सदना झाली जाती । तामसी शक्ति निवारूनी । वारूनि मोहिनी तामसी विद्या । चित्रलेखा निघाली सद्या । कपाट देऊनियां अनिरुद्धा । सेवी प्रमदा सप्रेमें । चित्रलेखा गेलियावरी । उषा निःशंक अभ्यंतरिं । प्रावरण सारूनि पाहे नेत्रीं । लोण उतरिं दृग्दोषा । पाहोनि नवयौवन लावण्य । आनंदभरित अंतःकरण ।
सरळ गौरीचें वरदान । त्रिजगीं धन्य मी आतां ।
तंव झाला प्रातःकाळ । जेंगटगजरें सूचिली वेळ ।
भैरव बीभास भूपाळ । गाती कुशळ गान्धर्वीं ।
वैदिक करिती अध्ययनें । छात्र तन्मुखें करिती पठनें। साग्निकीं करूनि संध्यास्नानें । प्रादुषीकरणें आदरिलीं । ऐसा होतां प्रभातगजर । झाला अनिरुद्धा जागर । मुखावरील सारूनि पदर । पाहे सादर चहूंकडे । तंव ते समीप देखिली उषा। जिचिया लावण्यशृंगाररसा । ा प्राशितां तृप्ति नेत्रसारसां । नोहे सहसा औत्सुक्मयें । म्हणे स्वप्नीं जे देखिली । ते हे वाटे मन्मथपुतळी । निद्राकाळीं वार्ता कथिली । तेही वेल्हाळी येथ नसे ।
Ad. देवदत्त परुळेकर








