मुंबई
होंडा मोटारसायकल्स अँड स्कुटर्स इंडियाने (एचएमएसआय) आपल्या कर्मचाऱयांसाठी व्हीआरएसची योजना आणली आहे.
देशातील दुसऱया क्रमांकाच्या कंपनीने नुकतीच कर्मचाऱयांसाठी स्वेच्छा निवृत्ती लागु केली आहे. कोरोनामुळे वाहन विक्रीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता कंपनी व्हीआरएसची योजना आखते आहे. अलीकडच्या काळात वाहनांच्या मागणीत घट झालेली आहे. सध्या भारतीय ऑटो क्षेत्र मोठय़ा आव्हानांना तोंड देत आहे.









