प्रतिनिधी/बेळगाव
वेळ 8.15 वा.ची. दिवस पूर्ण झाल्याने कळा असहय़ होऊन एका महिलेला घेऊन रिक्षा हॉस्पिटलचा शोध घेऊ लागली. परंतु अचानक त्या महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाली. सुदैवाने हट्टीहोळ गल्लीत असणाऱया माई हॉस्पिटलच्या स्टाफने नागरिकांच्या सहकाऱयाने ही प्रसूती सुखरुप पार पडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की वडगाव येथील एका महिलेला कळा सुरू झाल्या तेव्हा रिक्षाने तिला प्रसुतीसाठी हॉस्पिटलला नेण्यासाठी तिचे कुटुंबिय घेऊन आले परंतु लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल बंद, शोधाशोध करत सदर रिक्षा महिलेसह हट्टीहोळ गल्ली येथे आली. येथे माई हॉस्पिटल आहे. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच सदर महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमधील डॉ. विनायक भातकांडे, सहाय्यक मोहन पवार, परिचारिका मंगल जाधव व बेबी यांनी ही प्रसूती पूर्ण केली. प्रसूती याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की वडगाव येथील एका महिलेला कळा सुरू झाल्या तेव्हा रिक्षाने तिला प्रसुतीसाठी हॉस्पिटलला नेण्यासाठी तिचे कुटुंबिय घेऊन आले परंतु लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल बंद, शोधाशोध करत सदर रिक्षा महिलेसह हट्टीहोळ गल्ली येथे आली. येथे माई हॉस्पिटल आहे. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच सदर महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमधील डॉ. विनायक भातकांडे, सहाय्यक मोहन पवार, परिचारिका मंगल जाधव व बेबी यांनी ही प्रसूती पूर्ण केली.
बाळ आणि बाळंतिण दोघेही सुखरुप आहेत. सध्या कोरोनाची धास्ती घेऊन नागरिक परस्परांपासून अंतर ठेवून आहेत. परंतु सदर महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. मिलिंद हलगेकर संचालित माई हॉस्पिटलच्या स्टाफने ही प्रसूती सुखरुप पार पाडली. त्यानंतर त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन नेंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला. याबाबत डॉ. हलगेकर म्हणाले, सदर महिलेची प्रसूती नैसर्गिकरित्या होते आहे. हे लक्षात आल्याने आमच्या स्टाफने त्यासाठी पुढाकार घेतला. गल्लीतील जांगळे, इतर नागरिक आणि महिलांनी त्यांना मदत केली.









