कॅलिफोर्निया :
हॉलिवूड लिजंड किर्क डग्लस यांनी बुधवारी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे पुत्र आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मायकल डग्लस यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जगाला ही दुःखद माहिती दिली आहे. किर्क डग्लस यांनी वयाच्या 103 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
डग्लस यांना 20,000 लीग्स अंडर द सी, लस्ट फॉर लाईफ आणि लोनली आर द बेव्ह या अभिजात चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यांना 1949 च्या चॅम्पियन या चित्रपटातील अभिनयासाठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते. किर्क यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेला द बॅड अँड द ब्युटीफुल तर 1956 मध्ये लास्ट फॉर लाईफ या चित्रपटांची निर्मिती केली होती









