नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मिती कंपनी हॉनरने येणाऱया काळात गेमिंग लॅपटॉप सादर करण्याचे निश्चित केले आहे. चिनी कंपनीचा हा नवा लॅपटॉप 16 सप्टेंबरला बाजारात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हंटर या नावासह येणाऱया लॅपटॉपसह वॉच जीएस प्रो आणि वॉच इएस ही उत्पादने कंपनी लाँच करणार आहे. सध्यातरी उत्पादने चीनमध्येच सादर करून विक्रीकरता उपलब्ध केली जाणार आहेत. या नव्या गेमिंग लॅपटॉपसाठी सुपर कार्सची प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते.









