प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीमधील हॉटेल व्यवसायिकाविरूद्ध बदनामीकारक पोस्ट टाकल्याचा प्रकार समोर आला आह़े चुकीच्या पोस्ट टाकून समाजात गैरसमज निर्माण करणाऱयांविरूद् कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े यासंबधी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी संस्थेच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आल़े
चुकीच्या पोस्ट सोशल माध्यमांवर टाकून बदनामी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत आहेत़ रत्नागिरीमधील एका हॉटेलमध्ये कॉरन्टाईन केलेल्या माणसांना ठेवण्यात आले आहे यासंबंधी चुकीच्या पोस्ट सोशल माध्यमांवर टाकण्यात आल्या होत्य़ा रत्नागिरीमध्ये सामाजिक कार्यात सहभाग असणाऱया या हॉटेल मालकाची बदनामी करून नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने या पोस्ट करण्यात आल्या आहेत़ असा आरोप या निवेदनात करण्यात आला आह़े तरी दिशाभूल करणाऱया पोस्ट टाकणाऱयांविरूद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आह़े









