शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले निवेदन
प्रतिनिधी/सांगली
सांगली व मिरज शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जमावबंदीच्या काही निर्बंधामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणी व लोकांना होत असलेल्या असुविधे बदल शहर जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
या चर्चेनंतर पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना सर्व हॉटेल व्यावसायिक व खाद्य विक्रेते यांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. तर, सांगली मिरजेतील हॉटेल व्यावसायिकांना निर्बंध लावताना शिथिलता द्यावी अशी मागणी केली. याबाबत मंत्री वडेट्टीवार यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








