प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा हाहाकार होत असताना कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कोरेगाव यांच्या सहकार्याने करोना केअर सेंटर चालू केले आहे. ज्या पेशंट्सना ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे, ज्यांचे वय दहा ते साठ आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा असिमटॅमेटीक पेशंट करिता हे प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर चालू केले आहे.
हॉटेल राधिका पॅलेस हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. यापूर्वीही मागील महिन्यात विदेशावरून येणाऱया प्रवाशांसाठी हॉटेल राधिका पॅलेसमध्ये आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली होती. ऐकून 60 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. रमेश पाटिल व डॉ. आदिश पाटिल, डॉ. ओंकार पाटील यांनी स्वतः लक्ष देऊन हे सेंटर चालू केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासाठी त्वरित मान्यता दिली व सेंटर कसे असावे यासाठी मार्गदर्शन केले. या सेंटरमध्ये डॉक्टरचे निरीक्षण, राहण्याची व्यवस्था, जेवण, नाष्टा, इत्यादी,गोष्टींची व्यवस्था आहे. हा प्रायव्हेट कोरोना केअर सेंटर असल्याने सरकारी मार्गदर्शननाप्रमाणे पेशंटकडून पेमेंट घेतले जाणार आहे, असे सांगितले. ज्या पेशंटना अशा व्यवस्थेची गरज असेल त्यांनी कृपया पाटील हॉस्पिटल कोरेगाव 9881662753 या नंबरवर किंवा 02162 – 233133 या नंबर वर फोन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









