3 लाख रुपये आहे एक दिवसाचे भाडे
जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत, ज्यांचा लुक, डिझाइन सर्वकाही हैराण करणारे असते. या हॉटेल्समध्ये अनेक विचित्र गोष्टी देखील आहेत, परंतु सर्वात विचित्र म्हणजे यात भूत राहत असल्याचा लोक दावा करतात. या अफवा असल्या तरीही लोक अशा हॉटेल्समध्ये जाण्यास घाबरतात. सध्या स्कॉटलंच्या एका हॉटेलमधील रुमची मोठी चर्चा सुरू आहे. ही रुम आतून दिसण्यास अत्यंत भयावह असल्याने लोक भाडे दिल्यावरही त्याबाहेरच झोपणे पसंत करतील.

स्कॉटलंडच्या स्टर्लिंगमध्ये 14 व्या शतकातील एक किल्ला असून जो आता सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या किल्ल्यात कधी मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स आणि प्रिन्स चार्ल्स देखील वास्तव्यास राहिले होते. आता हा किल्ला एअरबीएनबीवर लिस्ट करण्यात आला आहे. येथे एक रात्र वास्तव्य करण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च करावे लागतात. तर पूर्ण किल्ला बुक करायचा असल्यास एका रात्रीसाठी 3 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो.
किल्ल बाहेरून सुंदर दिसत असला तरीही आतून हैराण करणार आहे. याच्या आतील इंटीरियर इतके भयानक वाटते की लोक ते पाहून बाहेरच झोपण्यासाठी तयार होतात. अलिकडेच अभिनेता रिक कार या हॉटेलमध्ये उतरला होता आणि त्याने हॉटेलच्या इंटीरियरशी निगडित अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. या किल्ल्याची निर्मिती ग्रामीण भागात झाली आहे. अरुंद भुयारातून खालच्या दिशेने गेल्यावर हॉटेलची रुम सापडत असल्याचे रिकने म्हटले आहे.









