वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या भीषण वणव्याच्या दुर्घटनेत अनेक प्राणी मरण पावले असून काही बरेचजण या दुर्घटनेत बळी पडले आहेत. या दुर्घटनेतील बळींसाठी हॉकी इंडियाने 25 हजार डॉलर्सची रक्कम रेडक्रॉस बुशफायरला मदत म्हणून जाहीर केली आहे.
या भीषण दुर्घटनेतील संबंधीत कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भारतीय महिला आणि पुरूष संघातील खेळाडूंच्या स्वक्षऱया असलेल्या दोन शर्टसचा लिलाव करण्यात आला. हॉकी ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षा मॅलेनी वूसनेम यांनी हॉकी इंडियाचे प्रमुख मुश्ताक अहमद यांचे आभार मानले आहेत.