नवी दिल्ली/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामान करणाऱ्या भारताला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अमेरिका शक्य ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हॅरिस यांनी “भारताने कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेची मदत केली होती आणि आता आम्ही भारताची मदत करण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत”, असं म्हटलं आहे.
भारतामध्ये कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढणं हे हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी म्हंटल आहेत. तुमच्यापैकी ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत, अशा शब्दांमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी भारतीयांना धीर दिला आहे. सध्या भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असल्याचं लक्षात येताच आम्ही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं हॅरिस यांनी म्हटलं.
२६ एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताला मदत करण्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती कमला हॅरिस यांनी दिली. ३० एप्रिलपर्यंत अमेरिकेच्या लष्कराने आणि नागरिकांनी भारतासाठी मदतीची पहिली खेप पाठवली होती. आम्ही रिफिल करता येतील असे ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, एन ९५ मास्क दिले आहेत. आम्ही अजून मास्क पाठवण्यासाठी तयार आहोत. रेमेडिसविर औषधांचा साठाही आम्ही भारतामध्ये पाठवला आहे, असं कमला हॅरिस यांनी सांगितलं.









