ऑनलाईन टीम / लखनऊ :
संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सर्वच राज्यांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यातच आता उत्तर प्रदेश हे 75 लाख टेस्ट करणारे पहिले राज्य बनले आहे. तर गृह अपर मुख्य सचिव अविनाश कुमार अवस्थी यांनी दावा केला आहे की, 30 सप्टेंबरच्या आधी उत्तर प्रदेश 1 करोड चाचण्या करणारे पहिले राज्य होईल. आता पासून प्रदेशात प्रत्येक दिवशी दोन लाख चाचण्या करण्याची तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या प्रदेशात कोविड 19 चाचण्यांची संख्या 75 लाख पेक्षा अधिक असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र प्रदेशात कोरोनाचे संकट दररोज वाढत आहे. कालच्या दिवशी प्रदेशात 1 लाख 47 हजार 082 चाचण्या करण्यात आल्या. त्याबरोबरच 75 लाख पेक्षा अधिक चाचण्या करणारे पहिले राज्य बनले आहे.
आरोग्य आणि चिकित्सा अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 12 हजार 036 इतकी आहे. त्यातील 2 लाख 39 हजार 485 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्य स्थितीत 68,122 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.









