ऑनलाईन टीम
वाढती गुन्हेगारी, बलात्काराच्या घटना यामुळे सुरक्षेतेचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. याबाबत जगभरात कोणते शहर सर्वात सुरक्षित आहे याचा सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणात डेन्मार्कमधील कॉपेनहेगेन हे शहर सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. ‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजेन्स युनिट‘ने हे सर्वेक्षण केले होते. या यादीत भारताची राजधानी नवी दिल्लीचा समावेश पहिल्या ५० शहरांमध्ये आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी आहे.
‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजेन्स युनिट’ या संस्थेद्वारे २०१५ पासून सुरक्षित शहरांबाबतचे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या या सुरक्षित शहराच्या यादीत कॉपेनहेगेननंतर दुसऱ्या स्थानी कॅनडाचे टोराँटो, तिसऱ्या स्थानावर सिंगापूर आणि चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराचा क्रमांक आहे. याचबरोबर टोकियो, ॲमेस्टरडॅम, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबर्न, स्टॉकहोम ही शहरे टॉप टेन मध्ये आहेत.
यावर्षी एकूण ६० शहरांच्या यादीत प्रथमच नवी दिल्ली आणि मुंबईचा समावेश झाला आहे. दिल्ली ४८ व्या तर मुंबई ५० व्या स्थानी आहे. सुरक्षित शहर ठरविण्याच्या निकषात आरोग्य, पायाभूत सुविधा, डिजिटल, पर्यावरण सुरक्षा, इत्यादी निकषांच्या आधारे शहरांना गुण देण्यात आले. यावर्षी क्रमवारी कोरोना महामारीचा देखील विचार करण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









