प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहकांच्या समस्या त्वरित निवारल्या जाव्यात यासाठी हेस्कॉमकडून प्रत्येक महिन्याच्या तिसऱया रविवारी तक्रार निवारण बैठक आयोजित केली जाते. शनिवारी नेहरूनगर येथील शहर उपविभाग 3 मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहर कार्यकारी अभियंता एम. टी. अप्पण्णावर उपस्थित होते. मात्र या बैठकीला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
वीज बिलातील तफावत, वाढीव वीजबिल यासह इतर तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी समस्या जाणून घेत त्या लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन केले. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मण्णावर, पवनकुमार, सरस्वती यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









