ऑनलाईन टीम / नवी मुंबई
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी माझ्या मतदार संघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे चकचकीत झाले आहे. असे वक्तव्य आमदार केले होते. पाटील यांनी रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. याबद्दल त्यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती.
याची दखल घेत भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या कि, सामान्य लोक बोलतात हे मी समजू शकते. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असे विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे.
हेमा मालिनी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी माझे गाल चांगले ठेवत असतील हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. पण अशा प्रकारची कमेंट करणे योग्य नाही, असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी लालूंनी असे विधान केले होते. त्यानंतर अनेकांनी असेच बोलायला सुरुवात केली. सामान्य लोकांनी बोलणे वेगळे. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असे विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असे विधान केले जाऊ नये. असा संताप हेमा मालिनी यांनी व्यक्त केला आहे.
या वक्तव्याचे शिवसेना खासदार संजय राउत यांनी समर्थन केले आहे. या समर्थनात बोलताना राउत म्हणाले या प्रकारची तुलना आधीही झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. या विधानाकडे नकारात्मकरित्या पाहू नका. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी याचे उदाहरण दिले होते. आम्ही सर्व हेमा मालिनींचा आदरच करतो. असे म्हणत राउत यांनी गुलाबरावांना समर्थन दिले होते.