लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीचा नुकताच 40 वा वाढदिवस झाला. हेमांगीने एक पोस्ट शेअर करत ती आता 40 वर्षाची झाल्याचं म्हटलं आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू झाला. हेमांगीने आपलं वय सांगूनही चाहत्यांना त्यावर विश्वास बसत नव्हता. वयाच्या मानाने तरुण आणि फिट दिसणाऱया हेमांगीला अनेकांनी ती 40 वर्षांची दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. यावर एक पोस्ट शेअर करत तिने सर्वांचे आभार मानले.
हेमांगीने पोस्ट करत आपले हटके फोटो शेअर केले आणि लिहिलं, तुमच्या शुभेच्छांसोबत, चल, काही काय? 40?, कुठल्या अँगलने 40?, अय्या अजूनही किती लहान दिसतेस, 21 वर्षांची असशील, एज इज जस्ट अ नंबर, अरे यार, 40? हिचं काय करायचं?, 14 चं 41 चुकून लिहिलं असशील… करेक्ट कर वगैरे वगैरे… हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल, कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे. असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव!’









