हार्वे अल्टर, मायकल हय़ूटन, चार्ल्स राईस यांना यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम / वृत्तसंस्था
वैद्यकशास्त्रातील यंदाचा (2020) नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल हय़ूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला असून ‘हेपॅटायटिसöसी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिघांना या प्रति÷sच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार समितीचे प्रमुख थॉमस पर्लमन्न यांनी सोमवारी स्टॉकहोम येथे या पुरस्कारांची घोषणा केली.
सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार रक्तातील ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे होतात. या आजारांशी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे. ‘हेपॅटायटिस-सी’ विषाणूंमुळे होणारे आजार या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्मय झाले. तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार करण्यात यश आले आहे, असे नोबेल समितीने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे.
हेपॅटायटिस आजाराचे जगभरात जवळपास 70 दशलक्ष रुग्ण असून वर्षाला 4 लाख जणांचे बळी जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले होते. जगभरातील सर्वच देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूचा शोध लावण्यात आणि त्यानंतर त्यावर योग्य औषध शोधण्यात संशोधकांना यश आल्यामुळे सध्या या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.









