वृत्तसंस्था/ मुंबई
राजस्थान रॉयल्स संघातील विंडीजचा फलंदाज हेतमेयर नुकताच विंडीजहून येथे दाखल झाला आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी होणाऱया सामन्यात हेतमेयर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळेल, अशी माहिती या संघाच्या व्यवस्थापकाने दिली.
हेतमेयरची पत्नी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने तो 8 मे रोजी गयानाला रवाना झाला होता. त्याला या स्पर्धेतील दोन सामने हुकले होते. विंडीजहून येथे दाखल झाल्यानंतर तो सध्या क्वॉरंटाईनमध्ये असून शुक्रवारी राजस्थान संघाचा शेवटचा सामना चेन्नई बरोबर होणार आहे. या सामन्यात 25 वर्षीय हेतमेयर उपलब्ध राहील, अशी आशा आहे. राजस्थान रॉयल्सच्या फ्रांचायजीनी हेतमेयरला 8.5 कोटी रूपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. त्याने या स्पर्धेत 11 सामन्यात 291 धावा जमविल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.









