ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काल माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधनाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. या विधनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेताना रंजन यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. त्यामुळे सभागृहात गेंधळ उडाला.
लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर अधीर रंजन चौधरी म्हणाले की, लोकसभेत सीएए आणि एनआरसीबाबत शांततेत निदर्शने होत आहेत. आम्ही महात्मा गांधीच्या आदर्शांचे अनुसरण करून शांततेत निदर्शने करीत आहोत. मात्र, जे गांधींना वाईट बोलत आहेत, शिवी देत आहेत ते रावणाची औलाद आहे. मात्र या विधनावर भाजपा खासदारांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गदारोळ माजला होता.
अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण करणाऱया भाजपाविषयी आक्षेपार्ह भाष्य केले. गोंधळाच्या वेळी सभापती म्हणाले की, चौधरी यांचे वक्तव्य कामकाजात समाविष्ट केले जाणार नाही. मात्र गांधींवर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याची मागणी काँग्रेस खासदारांनी उचलून धरली होती.









